पुसद (Pusad Crime) : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या काळी( दौ.) रस्त्यावरील हिवरी येथे साडेपाच वाजताच्या सुमारास हिवरी फाट्यावर घडली. माहितीनुसार, संजय सोरते (वय 45) असे जखमीचे नाव आहे तर गणेश किल्लोरे (वय 30 ) रा.हिवरी असे आरोपीचे नाव आहे. संजय सोरते हा काळी दौ येथून घेऊन घरी जाण्यासाठी येत असताना हिवरी फाट्यावर अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपी गणेश किल्लोरे याने जुन्या वादाचा वचपा काढत (Pusad Crime) त्याच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले व त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
सदर घटना काही अंतरावर उभ्या असलेल्या युवकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. (Pusad Police) आरोपीच्या तावडीतून जखमीची सुटका करून गंभीर जखमीला पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात (Pusad Hospital) उपचाराकरिता पाठविले. सदर घटनेची माहिती काळी( दौ.) येथील पोलीस चौकीला दिली. येथील पोलीस चौकीचे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माथने, महेश बाबर यांच्यासह ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपीला घरातून अटक करून घटनेत वापरलेल्या चाकू जप्त केला. (Pusad crime) याप्रकरणी फिर्यादी रमेश साहेबराव कुंभारे रा हिवरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध (Pusad Police) पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 307,341 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास (Pusad Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.