पुसद (Pusad Crime) : तालुक्यातील मौजे वडगाव येथून देशी कट्टा बाळगणारा, जेरबंद करण्याची कारवाई दि. 21 जुलै रोजी (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद शाखेने पार पडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीदारांकडून गुन्हे शाखेस गोपनीय माहिती मिळाली की, तालुक्यातील मौजे वडगाव येथील गौरव विनोद चव्हाण या तरुणाकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा असून तो मांगीलालनगर विठळा वार्ड या परिसरात फिरत होता. (Pusad Crime) गुन्हे शाखेच्या पथकाने त्या परिसरात जाऊन सदरील इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. व विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गौरव विनोद चव्हाण वय 20वर्ष वडगाव ता. पुसद असे सांगितले. त्याला गावठी कठ्याबाबत विचारले असता तो म्हणाला की गावठी बनावटीचा देशी कट्टा घरी ठेवलेला आहे. त्याने त्याच्या राहत्या घरातून पंचायत समक्ष देशी कट्ट्याची बंदूक काढून दिली.
त्यासोबतच दोन राऊंड गोळ्या त्या पण काढून दाखविल्या. ते जप्त करून सदर आरोपीस ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता त्याने ही देशी बनावटीची बंदूक त्याचा मित्र अतिश उर्फ कावा विनोद राठोड रा.वडगाव याने दिल्याचे सांगितले. सदरील पथकाने अतिश बाबत विचारपूस केली असता तो कामानिमित्त पुण्याला गेल्याचे कळले. पथकाने आरोपी 1,गौरव विनोद चव्हाण वय 20 वर्ष, आरोपी2, शैलेश प्रल्हाद चव्हाण वय 24वर्ष रा. वडगाव यांच्याकडून दोन मोबाईल एक देशी कट्टा दोन राऊंड गोळ्या असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसरा आरोपी अतिश उर्फ कावा विनोद राठोड 18 वर्ष राहणार वडगाव या तिघांविरुद्ध (Pusad Police) पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई जिपोअ पवन बनसोड, अजिपअ पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर, आणि गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यवतमाळ ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गजानन गजभारे, चापोउपनि रेवन जागृत, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहम्मद ताज यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) धडाकेबाज कारवाईने अवैधरित्या बनावटी बंदुका बाळगणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले, गुन्हेगारीचे लोन आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोहोचले, आजचा भरकटलेला तरुण गुन्हेगारी विश्वाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊन गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. मात्र दुर्दैव हे तरुण आपले अख्खे आयुष्य बरबाद करीत आहेत हे विशेष गुन्हेगारी विश्वामध्ये या कारवाईने मात्र धडकी भरल्याचे दिसत आहे “