30 लिटर खाद्यतेल चोरणारा आरोपी जेरबंद; 4950 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुसद (Pusad Crime) : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काळी (दौ.) दि. 4 सप्टेंबर रोजी एका दुकानातून 30 लिटर खाद्यतेल चोरी गेल्याची घटना घडली होती. फिर्यादी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भात तक्रार दाखल केली. यावरून (Pusad Police) ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 0675/24/ कलम303-2 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल (Pusad Crime) करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने या गुन्ह्याचा शोध लावण्याकरिता खबऱ्यांची पेरणी करून त्यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहितीनुसार 5 सप्टेंबर रोजी घटनेतील आरोपी प्रमोद दत्ता राठोड वय 35 वर्ष रा. काळी( दौ.) याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
त्याला जेरबंद करून पुढील कारवाई करिता पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीकडून चोरी गेलेला माल वरील प्रमाणे जप्त करण्यात आला. सदरची कारवाई (Pusad Police) जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या सूचनेनुसार ज्ञानोबा देवकते (Pusad Crime) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजभारे, पीएसआय शरद लोहकरे, हेड कॉन्स्टेबल तेजाब रणखांब, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड रवींद्र श्रीरामे यांनी केली.