मंदिरात तोडफोड व पुजाऱ्याला ही मारहाण, दोन आरोपींवर गुन्हे दाखल
पुसद (Pusad Crime) : शहर पोलीस स्टेशन (Pusad City Police) अंतर्गत येत असलेल्या काकडदाती येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत (Sant Sewalal Maharaj Mandir) संत श्री सेवालाल महाराज यांच्या मंदिरात घुसून दोन दारुड्या युवकांनी मंदिराची तोडफोड करीत मंदिरातील महंत बाबू सिंग महाराज यास धक्काबुक्की सह मारहाण केल्याची घटना दि. 16 जुलै रोजी घडली. या संदर्भात मंदिराचे महंत पुजारी बाबुसिंग महाराज यांनी सर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
माहितीनुसार, शहरालगत असलेल्या काकडदाती येथील संत सेवालाल महाराज मंदिर (Sant Sewalal Maharaj Mandir) येथील महंत बाबुसिंग पुना आडे वय 69 वर्ष रा. काकडदाती हे मंदिरात उपस्थित असताना दि. 16 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काकडदाती येथीलच रहिवासी असलेले रोहन विलास कोरडे वय 25 वर्ष व बाळू वामन ढोकणे वय 35 वर्ष हे मंदिरात दारूचा नशेत आले. त्यावेळी या दोघांचेही कपडे चिखलाने भरलेले होते. (Pusad Crime) दारूच्या नशेतच आम्हाला देवाचे दर्शन करायचे आहे असे म्हणून पाया पडले. महंत यांनी दोघांना हाताला धरून उभे केले असता तू आम्हाला कसा काय हात लावला ? असे म्हणून रोहन विलास कोरडे वय 25 वर्ष व बाळू वामन ढोकणे वय 35 वर्ष या दोघांनी महंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की व मारहाण केली. त्यांनी संत सेवालाल महाराज व जगदंबा माता यांच्या मंदिरात तोडफोड करीत बाबुसिंग महाराजांची मंदिरा बाहेर उभी असलेली मोटर सायकलची ही तोडफोड केली.
पुजारी बाबूसिंग पुना आडे यांना जीवानिशी मारून टाकण्याची धमकीही दिली. अशा प्रकारची फिर्याद महंत बाबू सिंग आडे यांच्यामार्फत शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घटनेतील आरोपी रोहन विलास कोरडे व बाळू वामन ढोकणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 296 , 351(2) , 324(4) , 324(5) , 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गोरसेना या सामाजिक संघटना ही यामध्ये सहभागी झाली. या (Pusad Crime) घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, अशी निवेदनाद्वारे मागणी एसडीपीओंना गोर सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटने मात्र गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे. हे पुन्हा अधोरेखित झाले आहे हे विशेष.