पुसद (Pusad Crime) : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या काळी ( दौ.) येथील वसंतराव नाईक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेली एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण (Sexual exploitation) केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी (Pusad Police) पुसद ग्रामीण पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख रियाज शेख मेहबुब (वय २२) रा. काळी( दौ.) ता. महागाव असे आरोपीचे नाव आहे.
पॉक्सो व अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Police) हद्दीत एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शेख रियाज याने ओळख निर्माण केली. दरम्यान दोघांत फोनवर बोलणं भेटने व्हायचे . मार्च २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीचे आई वडील ऊस तोडणीसाठी बाहेर गावी गेले. रात्री दरम्यान शेख रियाज हा मुलीच्या गावी आला आणि अल्पवयीन मुलीला घराजवळील गोठ्यात भेटायला बोलविले व लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले. अशाच प्रकारे अनेकदा त्या युवकाने अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ऊसतोडीवरून पिडीत अल्पवयीन मुलीचे आई-वडील गावी परत आले. त्यांना मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच मुलीच्या आईने मुलीला पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी आणले तेथे डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले.
या याप्रकरणातील आरोपी अटकेत
या (Sexual exploitation) प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने (Pusad Police) पुसद ग्रामिण पोलीस स्टेशन गाठून दि.25 मे रोजी तक्रार दिली. (Pusad Police) पोलिसांनी बघत तातडीने ॲक्शन मोडवर येत घटनेतील आरोपी शेख रियाज शेख मेहबूब (वय-२२ वर्ष) रा. काळी( दौ.) याच्या पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात विरुद्ध कलम 366(अ ),376(3),376(2), (n ), आयपीसी 4,6 पोक्सो , 3(1), (w )(i ), (ii ),3(2), (va ) ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Pusad Police) पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहेत.