पुसद (Pusad Crime) : तालुक्यासह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम साहित्य मुरूम ढब्बर गिट्टी मोठ्या प्रमाणात (Pusad Crime) अवैध उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे. परिसरातील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अकार्यक्षमतेमुळे सदरील तस्करांचे मोठे धाडस वाढले असून वाटेल त्या ठिकाणावरून उत्खनन करून बांधकाम साहित्य शहरासह तालुक्यांमध्ये विक्री केल्या जात आहेत.
गंभीर बाबीमुळे मात्र पर्यावरणास मोठे नुकसान होत आहे. तर शासनाला या माध्यमातून मिळणाऱ्या रॉयल्टी यामुळे बुडत आहे. शासनाचे लाखो रुपये रॉयल्टी च्या माध्यमातून चुना लावल्या जात असल्यामुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेत तहसीलदार महादेवराव जोरवर यांनी गेल्या दोन दिवसापासून गुप्त खबर यांना मार्फत मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी सापळा रचून अशा अवैध व मुरूम व रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. या व्यवसायामध्ये अनेक पांढरपेशी राजकीय कार्यकर्ते,नेते घुसल्यामुळे कमिशनमध्ये जास्त पैसा मिळविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात अवैधपणे उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे.
माहूर रोड वरील काटखेडा फाटा येथे अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच-04/fu -7741 या वाहनाला तहसीलदार महादेवराव जोरवर व निवासी नायब तहसीलदार गजानन कदम यांनी पुढील महसुली कारवाई करिता ताब्यात घेतले. सदर वाहनाचे मालक निलेश नरेंद्र दुबे आहेत. तर या वाहनांमध्ये विनापरवान की अवैध दोन ब्रास मुरूम मिळून आला. पुढे अशाच पद्धतीच्या कारवाया केल्या जातील शासनाचा महसूल बुडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडल्या जाणार नाही.
– तहसीलदार महादेवराव जोरवर