पुसद (Pusad Crime) : रात्री अंदाजे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान शहरातील शनी मंदिर जवळील पंजाब नॅशनल बँक समोर असलेल्या हॉटेल सनी प्राईड मध्ये सौ. सपना संजय मोरे वय 23 वर्ष या महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने (Pusad Crime) एकच खळबळ उडाली. (Pusad Police) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ.सपना लक्ष्मण पाईकराव रा. बोरगडी हिने आरोपी पती संजय प्रदीप मोरे वय 25 वर्ष रा. निंबी याच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
काल सायंकाळची घटना, पुसद मध्ये एकच खळबळ
सदर पती-पत्नी मधील वाद विकोपाला गेला होता. प्रेमविवाह असल्यामुळे घरच्यांचाही (Pusad Crime) याला विरोधच होता. अशातच हे दोघे दि.7 जून रोजी दुपारी हॉटेल सनी प्राइड येथे दुपारी 1 वाजता च्या दरम्यान आले. हे दोघे रूम नंबर 108 मध्ये थांबले होते. सायं.7 वाजता च्या दरम्यान हॉटेल सनी प्राईडचे संचालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता रूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेलच्या संचालकांनी (Pusad Police) शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. त्यांनी शहर पोलिसांना वरील घटना विशद केली. तातडीने सर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर आपल्या सर्व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा हे हत्या प्रकरण उघडकीस आले.
मृतक सपना संजय मोरे वय 23 वर्ष हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृतक सपना ही विवस्त्र अवस्थेत आढळून आली. (Pusad Crime) मृतक सपना हिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार झाला होता. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी ठाण मांडले होते. तर पोलिसांचे दुसरे पथक निर्माण करून सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनात आरोपी शोध कामी पाठविण्यात आले होते. तर (Pusad Police) पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कसून शोध घेतला असता निंबीच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपी पती संजय प्रदीप मोरे याला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले.
आरोपी पतीची (Pusad Police) शहर पोलिसांमार्फत कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र या घटनेने पुसद शहरासह तालुका हादरला आहे. या (Pusad Crime) संदर्भात मृतक विवाहितेची वडील लक्ष्मण पाईकराव रा. बोरगडी यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपी पती संजय प्रदीप मोरे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 379/2024 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक (Pusad Police) जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस कॉन्स्टेबल उंचेकर, गोपनीय पोलीस कॉन्स्टेबल विभागाचे नितेश भालेराव, डीबीचे पोलीस कर्मचारी अधिकारी शुद्धोधन भगत, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष राठोड यांच्यासह सीनियर पोलीस कॉन्स्टेबल रमेश राठोड या सर्वांनी कामगिरी पार पडली.