संभाजीनगर (पुसद) येथील घटना, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुसद (Pusad Crime) : शहरातील संभाजीनगर येथे दोन धारदार तलवारी बाळगणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपराध क्रमांक 751/2024 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शेषराव उत्तम लोंढे वय 28 वर्ष रा. संभाजीनगर पुसद स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय खाबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, संभाजीनगर येथील एक युवक सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचेल अशा उद्देशाने दोन धारदार तलवारी बाळगून असल्याची माहिती प्राप्त झाली.
घटनेचे गांभीर्य बघत तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान संभाजीनगर गाठून आरोपीच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता घरामध्ये एका तलवारीच्या टोकास स्टील लोखंडी मूठ असलेली धातूची तलवार त्याची एकूण लांबी 33 इंच पात्याची लांबी 27.5 इंच मुठे ची लांबी 5.5 इंच पात्याच्या मध्यभागाची रुंदी 1.5 इंच अंदाजे किंमत दोन हजार रुपये, तर दुसरी धारदार स्टील धातूची लोखंडी तलवार त्याची एकूण लांबी 34 इंच, आत्याची लांबी 28.5 इंच,मुठे ची लांबी 5.5 तलवारीच्या पात्याच्या मध्यभागाची लांबी 1.5 इंच अंदाजे किंमत दोन हजार रुपये त्याच्या घरात असलेल्या पंगाखाली वरील वर्णनाच्या दोन तलवारी मिळून आल्यात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी गजानन गजभारे, सपोनी शरद लोहकरे, सुभाष जाधव,कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे,रमेश राठोड, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, मोहम्मद ताज, दुय्यम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र श्रीरामे यांनी केली.