पुसद (Pusad Death) : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील कृष्णनगर येथे दि.9 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परिसरात असलेल्या एका विहिरी मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू (Pusad Death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णनगर येथील फकीरा गोबरा चव्हाण वय 52 वर्ष या व्यक्तीचा मृतदेह परिसरातील बकऱ्या चालणाऱ्या नागरिकांना दिसला. बघता बघता गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. आणि घटनेची माहिती (Pusad Police) ग्रामीण पोलिसांना दिली.
पुसद तालुक्यातील कृष्णनगर येथे विहिरीत पडून व्यक्तीचा मृत्यू
तातडीने (Pusad Police) ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार शेख मकसूद व पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे यांनी घटनास्थळ गाठले. सहाय्यक फौजदार शेख मकसूद यांनी स्वतः विहिरीमध्ये उडी घेऊन त्या मृतक फकीरा गोबरा चव्हाण यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढला. सदरील मृतदेह येथील उपजिल्हा (pusad hospital) ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करिता रात्री आणला. (Pusad Police) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील व्यक्ती हा मानसिक आजाराने पीडित होता. आजाराला कंटाळून त्याने विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली. फिर्यादी उमेश फकीरा चव्हाण रा. कृष्णनगर यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डीसीआर क्रमांक 100/2024 मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास (Pusad Police) ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल फुलउंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख मकसूद व पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे, हे करीत आहेत.