पुसद तालुक्यात या घटनेने खळबळ
पुसद (Pusad death) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा येथील एका शेतातील विहिरीत प्रेमी जोडप्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह (Pusad death) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मांडवा येथील रहिवासी असलेला सुरेश अनिल राठोड वय 22 वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय 17 वर्ष रा. मांडवा हे दोघे प्रेमी युगल असून दि. 5 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच्या दरम्यान पळून गेले होते.
परंतु दि. 7ऑगस्ट रोजी आरती ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी 11 वाजताच्या दरम्यान रोजमजूर कामाकरिता गेला असता त्यांना भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचा (Pusad death) मृतदेह दिसून आला. यात महत्त्वाचे म्हणजे या दोघांच्या कमरेला एकमेकास घट्ट आवळून नायलॉनच्या पिवळा दोरीने बांधलेले होते. या घटनेची माहिती गावात पसरताच तात्काळ गावकरी तिथे हजर झाले व या घटनेची माहिती (Pusad police) ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्या दोघांच्या मृतदेहास बाजेच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढले.
प्रथमदर्शनी मृतदेह बघितले असता अंदाजे दोन दिवस आधी ही घटना घडली असावी असा अंदाज लावल्या जात आहे. (Pusad death) दोन्हीही मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले आहे. हे प्रेमीयुगल दोरीने एकमेकास घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. काहींच्या मते ही आत्महत्या तर काहींच्या मते ही हत्या असावी अशी चर्चा होताना दिसत आहे . मुलांच्या कुटुंबियामार्फतही आरोप केले जात आहे. पोस्टमार्टम चा अहवाल आल्यानंतर सत्य काय सत्य बाहेर निघेल. वृत्तलीपर्यंत (Pusad police) पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाली नव्हती.