पुसद (Pusad):- पुसद लागत असलेल्या महागाव तालुक्यातील मोरथ वाकोडी येथील उत्तम भडंगे यांच्या घरामध्ये दि.२ मे रोजी सकाळी दहा वाजता च्या दरम्यान घरगुती सिलेंडरचा स्फोट (Cylinder detonation) झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य हे लग्न (marriage) कार्याकरिता बाहेर असल्यामुळे जीवित हानी टळली.
घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक
मात्र उत्तम भडांगे यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक (Burn materials) झाले. घटनेची माहिती पुसद नगरपरिषदेच्या (Pusad Municipal Councils) अग्निशमन विभागाला मिळताच तातडीने पुसद नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख तेलंगे यांच्या निर्देशानुसार अग्निशमन वाहन चालक रवी नेटके, फायरमन (Fireman) अभिषेक अवताडे, प्रवीण गायकवाड, राजेश शेकापुरे, सुनील आत्राम यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व सदरील लागलेली आग विझविली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी या संदर्भात खबरदारी बाळगणे गरजेचे असून. कुलर, घरगुती सिलेंडर (cylinder) याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे हे विशेष. वृत्त लीही पर्यंत घटने संदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती.