पुसद (Pusad DP Road) : पुसद शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळून जाणाऱ्या (Pusad DP Road) डीपी रोडची अवस्था अत्यंत विदारक झाली असून. या परिसरामध्ये नागरी वस्तीसह मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आहे. या हॉस्पिटलमध्ये दुरून दुरून अतिशय सिरीयस रुग्ण उपचाराकरिता येत असतात सोबत नातेवाईक असतातच याशिवाय परिसरामध्ये नागरी वस्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे वास्तव या भागात आहे तर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशिवाय या हॉस्पिटल मधील डॉक्टर मंडळी व कर्मचारी मंडळी यांना तीन पाळी मध्ये आपले कर्तव्य पार पाडावे लागते.
महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्री अपरात्री आपल्या कर्तव्यावर जात असताना या (Pusad DP Road) रस्त्यावरील अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. ” दैनिक देशोन्नतीने ” या अगोदर या संदर्भात अनेकदा वृत्त प्रकाशित केले व कॅमेरा लेन्स सुद्धा घेतला. याची दखल घेत गतवर्षी पुसद नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांनी या रस्त्यावर मुरूम टाकून दिला होता. त्यांच्याच आदेशान्वये नगरपालिकेच्या विद्युत विभागातील सतीश शिनगारे व त्यांचे कर्मचारी यांनी दैनिक देशोन्नतीच्या प्रतिनिधीच्या विनंतीला मान देत या (Pusad DP Road) परिसरातील लाईटची दुरुस्ती करून परिसर प्रकाशमय केला होता हे विशेष.