पुसद (Pusad farmer) : महागाव तहसील अंतर्गत येत असलेल्या व गेल्या तीन वर्षापासून पांदण रस्त्यासाठी झटणाऱ्या पाच वेळा टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या हिवरा येथील पांडुरंग आडंगे या शेतकऱ्याला (Pusad farmer) महागाव तहसील मधील वादग्रस्त ठरलेले महसूल सहाय्यक प्रवीण पोहरकर हे तीस हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात अडकले होते. संबंधितांनी दि. 27 जून रोजी पुसद येथील जिल्हा सत्र न्यायालय श्रीमती राम गढीया यांच्या न्यायालयात हजर केले असता. (Bribery revenue assistant) लाचखोर महसूल सहाय्यक आरोपी प्रवीण पोहरकर ला विद्यमान न्यायालयाने सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेत 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.