पुसद (Pusad farmer) : यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र (Agricultural markets) कृषी बाजारपेठेमध्ये दिसत आहे. खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांना या हंगामात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच तालुक्यातील बळीराजा अस्मानी नैसर्गिक अवकाळी गारपीट अतिवृष्टी तर दुष्काळ या संकटांच्या मालिका ने पुरता वैतागून गेलेला बळीराजा पुन्हा खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांसह इत्यादी (Agricultural) कृषी साहित्य मध्ये मोठी दरवाढ झाल्यामुळे. बळीराजा चिंताग्रस्त झालेला दिसत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
यंदा तब्बल 25 दिवस उशिराने मान्सूनचा पाऊस तालुक्यात दाखल झाला होता. तर पेरण्या ही उशिरा झाल्यामुळे (Pusad farmer) शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. त्यात संकटांची मालिका अतिवृष्टी, गारपिट, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस वादळवारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. तर शासनाने घोषित केलेले गारपीटीचे, अतिवृष्टीचे अनुदान हे विविध तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पदरात अजूनही पडलेले नाही. किचकट अटींमुळे अनेक शेतकरी या मदतीपासून अजूनही वंचित राहिलेले आहेत.
तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ
शेतकऱ्यांच्या शेतमालाला (Agricultural markets) कृषी बाजारपेठेमध्ये योग्य ते दर मिळत नसल्यामुळे प्रचंड अळी अडचणीतून कृषी बाजारपेठेपर्यंत नेलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असेल तर बळीराजा किती दिवस तग धरणार? मात्र याचे कोणत्याही राजकीय पक्षांना आमदार खासदारांना काही सोयर सुतक नाही. शेतकऱ्यांचे भोवती फिरणारे राजकारण शेवटी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठले! अशी भावना तालुक्यातील बळीराजा बोलताना व्यक्त करीत आहे. हे विशेष.