पुसद (Pusad farmer) : शेतकऱ्यांच्या (farmer) भोवती राज्यातच नव्हे तर देशाचं राजकारण गेल्या 75 वर्षापासून सुरू आहे. मात्र या कालावधीमध्ये शेतकरी व शेती व्यवसाय फोफावला नाही. राज्यकर्त्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मागून आपली राजकीय भूक भागविली. मात्र अख्या जगाची भूक भागविणारा बळीराजा सर्वच शासनाच्या आजपर्यंतच्या चुकीच्या धोरणांमुळे चिंताग्रस्त झालेल्या दिसत आहे.
जागतिक महामारीच्या (global pandemic) काळातही अवघ्या जगाची काळजी बाळगणारा हा बळीराजा सर्वत्र बंदी असतानाही सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. म्हणून चांगलं शेती उत्पादन निर्माण करून रोज बाजारपेठेमध्ये ताजा भाजीपाला, दूध दही तूप एक केवळ आपलं कर्तव्य म्हणून पार पडणारा हा जगातील एकमेव (farmer) बळीराजा. नैसर्गिक,मानवनिर्मित, राजकारण्यां सह विविध संकटांचा सामना करत तटस्थ बांधावर उभा राहणारा बळीराजा हे महत्त्वाचं.