अद्यापही नुकसानीचे पैसे आलेच नाही
पुसद (Pusad Farmers KYC) : राज्य शासनाकडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना (Pusad Farmers) आर्थिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने घोषित केलेली रक्कम विविध कारणांनी काही काळ अटकल्यानंतर (Bank KYC) केवायसीची अडचण पुढे आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने घोषित केलेली मदत पोहोचलीच नाही. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेकडो चपला झिजवल्यानंतर केवायसी ची अट पूर्ण झाली. तर शासनाने 17 जून रोजी तालुक्यातील पीडित काही शेतकऱ्यांच्या खात्यात काही कोटी रुपये रक्कम वळते केले.
मात्र त्यानंतर एक महिना होऊ नये शासनाने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वळती केलेली नाही. तर काही (Pusad Farmers) शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम दाखवत आहे मात्र प्रत्यक्षात बँकेमध्ये गेल्यानंतर खातं नील आहे असं कॅशियर कडून संबंधित शेतकऱ्यांना सांगितल्या जातं. एकंदरीतच तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक तर केली जात नाही ना? अशी शंका बळीराजाला येत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राज्यकर्ते राज्य करीत असतात, तर (Bank KYC) विविध योजनांच्या घोषणा करून त्या योजनांची अंमलबजावणी करताना मात्र वेळ काढून धोरण स्वीकारल्या जाते. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
22 जुलै रोजी तालुक्यातील पिढीत (Pusad Farmers) शेतकऱ्यांनी पुसद तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या जालनामध्ये प्रत्यक्ष धडक देऊन शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जाब विचारला मात्र ते त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. पैसे हा शासनाच्या अधीन असलेला विषय आहे फक्त एवढेच उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी उत्तर दिले हे विशेष, तर आम्ही आमचे कर्तव्य शेतकऱ्यांप्रती असलेली आमची भावना व आमचे कार्य आम्ही चोक बसविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे शेतकऱ्यांना ते सांगण्यास विसरले नाहीत हे महत्त्वाचं.