पुसद (Pusad Flood) : एक सप्टेंबर रोजी पुसद तालुक्यामध्ये अतिवृष्टीने व ढगफुटीने हाहाकार माजवून अनेकांचे संसार उध्वस्त केले. तर अनेक गोरगरिबांच्या घरांमध्ये खाण्यापिण्याच्या साहित्यासह संपूर्ण घरामध्ये (Pusad Flood) पुराचे पाणी घुसल्यामुळे अनेकांची दैना अवस्था झाली होती. तर शेतीची ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये नुकसान झाले आहे. सदर नुकसानाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः फिल्डवर उतरून पाहणी केली तर महसूल विभागामार्फत या सर्व नुकसानग्रस्त लोकांचा सर्वे करणे सुरू झाले असून तातडीने शासनाकडे हा अहवाल पाठवून नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळावी असा प्रयत्न महसूल विभागाचा असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
तर अनेक सामाजिक संघटनांसह भारती मेंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या सामाजिक उपक्रमातून (Pusad Urban Cooperative Bank) पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अनेक गोरगरिबांना किराणा किटचे वाटप केले. तर (Pusad Flood) शहरातील मा शक्ती भीसी ग्रुप व दीपक परिहार मित्र मंडळ यांच्यावतीने ही अनेकांना खाद्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाबूलाल चौधरी दीपक परीहार, मुकेश जांगिड नवीन जयस्वाल खेमचंद जांगिड दामोदर जांगिड कालूजी, श्रीराम चौधरी सुभाष चौधरी मदन जांगिड राजेंद्र जगताप हेमंत आंबोरे संतोष मुकेश आकाश खडसे संजय गजभिये इत्यादी नागरिक उपस्थित होते.