पुसद (Pusad):- विधिमंडळात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Monsoon sessions) राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघाचे आ. इंद्रनिल नाईक यांच्या शिफारशीनुसार ११० वर्ष झालेल्या को कोषटवार दौलतखान विद्यालयाला इमारत बांधण्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला. अर्थसंकल्पामध्ये पुढील कामासाठी भरीव असा निधी आ. इंद्रनिल नाईक यांच्या प्रयत्नाने मिळालाआहे.
जमीनीचे भुसंपादन करणे या कामासाठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजुर
पुसद शहराकरिता रिंगरोडचे बांधकाम करण्याकरीता जमीनीचे भुसंपादन करणे या कामासाठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजुर करण्यात – आले आहे. पुसद भोजला, जांब बाजार, चिखली, पारवा, ब्राम्हणगाव, लाखी ते जिल्हा सिमेपर्यंत रस्ता व सिमेंट काँक्रिटचे बांधकामा करीता तिन कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. याच भागात रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे व संरक्षण भिंतीचे एक वर्षांपूर्वी अर्थमंत्री(Finance Minister) अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पुसद मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला व तो सार्थ ठरल्याचा अभिमान वाटत असल्याचं दिसत आहे. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पुसद विधानसभा मतदार संघात विविध कामासाठी निधी खेचून आणला. अर्थसंकल्प २०२४ मध्ये मतदार संघात विविध कामासाठी तब्बल ८४ कोटी ६४ लाखाचा निधी मंजुर करुन आणला, मागील ५ वर्षामध्ये त्यांनी मतदार संघात विविध विकास कामासाठी ५०० कोटीचे कामे मार्गी लावले ते येथे उल्लेखणीय, शेलु, डोंगरगाब, मोरध, धारमोहा, संनद ते गंगनमाळ रस्त्याची रुंदीकरण करण्यासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
फॉक्रिट नालीचे बांधकामाकरीता ४ कोटी रुपयाचा निधी मंजुर
पुसद, कारला, देवठाणा, जामनाईक रस्त्यासाठी व फॉक्रिट नालीचे बांधकामाकरीता ४ कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. पिंपळदरी, धनज, माळअसोली, गौळ, गोठा, बारमोहा, मुडाणा मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी बिचि ते धारमोहा रस्ता बनविण्यासाठी २ कोटीचा रुपयेचा निधी मंजुर करण्यात आला आहे. घाटोडी-गहुली, कान्होळ, ते जिल्हा सिमेपर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम (Cement drain construction) करण्यासाठी २ कोटी रुपयेचा निधी मंजुर करण्यात आला आहे. हर्षी दहिवड रस्त्याचा बांधकाम करणे ३ कोटी रुपये, चोंडी गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ७५ लाख, लाखी, राजना, भंडारी, ब्राम्हणगाव, पारवा, पन्हाळा जोडणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हीं दहिवड या रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करण्याकरीता १ कोटी २५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
सिमेंट काँक्रिट रस्ते अनविण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजुर
दहिवड ते वेगी खु, रस्त्याचे बांधकाम करणे २ कोटी रुपये,धुंदी गावांजवळ पुलाचे बांधकाम करणे २ कोटी, घोणसरा जोडरस्त्याचे पुलासहीत रस्त्याचे बांधकाम करणे २ कोटी रुपये, खंडाळा आडगांव रस्त्यावर जोडरस्त्यासह लहान पुलाचे बांधकाम करणे ७५ लाख रुपये. रुपये. पोखरी मेहजा रस्त्याचे पुलाचे बांधकाम करणे ३ कोटी रुपये, आडगांब रस्त्याची सुधारणा करणे ६० रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे १ कोटी २५ लाख रुपये, ब्राम्हणगांवात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख रुपये बांन्सी गांवात सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम करणे १० लाख रुपये. घंदी गावांत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख रुपये. बेहळा येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख रुपये, फोंडई गावासाठी १० लाख रुपये, सांडला गावासाठी १० लाख रुपये, सावरगांव गोरे साठी १० लाख रुपये, आमदरी गावात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामासाठी १० लाख रुपये, हीं गावांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये, खैरखेडा गावात सिमेंट काँक्रिट रस्ते बांधण्यासाठी १० लाख रुपये, तसेच जिंकी, बेलदरी, जवळी व मोखाड या गावात सिमेंट काँक्रिट रस्ते अनविण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. आ. इंद्रनील मनोहर नाईक यांनी खरोखरच पुसद विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा ध्यास घेतलेला दिसत आहे. असेच आमदार महोदयांनी राज्य शासनाकडे तगादा लावून पुसद जिल्ह्याची निर्मिती करावी अशी मागणी ही या निमित्ताने नागरिकाकडून सातत्याने होत आहे.