पुसद (Pusad government) : राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील महिलांसाठी जाळली बहीण ही योजना आणून प्रत्येक आपल्या लाडल्या बहिणीसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खात्यात टाकण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र दुसरीकडे (Pusad government) पुसद मधील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये, शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशन याशिवाय अनेक शासकीय कार्यामध्ये महिलांसाठी कोणतीही शौचालयाची सुविधा उपलब्ध केलेली नाही.
शहर पोलीस ठाण्यात ठाणेदार यांच्या केबिनमध्ये अंतर्गत वापरासाठी असलेल्या त्या सुविधेचा लाभ ठाणेदार उमेश बेसरकर हे माणुसकीच्या नात्याने त्यांच्या ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. मात्र मोठा अधिकारी आला तर ते त्यांनाही शक्य होत नाही. अशीच अवस्था सर्वच कार्यातील प्रमुखांची झालेली आहे. महिलांनी करायचं काय. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्तव्य निभावत असताना नैसर्गिक विधी निर्माण झाली तर त्याचे निराकरण करण्यासाठी एक तर घर घाटावं लागतं किंवा वरिष्ठांच्या परवानगीने त्यांची केबिन वापरावं लागतं.
हे राज्यातील राज्यकर्त्यांचे दुर्दैव, त्यातही पुसद मधील राज्यकर्त्यांचा तर अति दुर्दैव अकार्यक्षम लोकप्रतिनिधी कर्तव्याची भावना शून्य झालेले नेते वरिष्ठांचे झालेले दुर्लक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक तथा साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक याशिवाय अमरावतीच्या आईजी यांनी किमान आपल्या कर्मचाऱ्यांचा विशेष करून महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. (Pusad government) सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांची भावना आहे हे विशेष.