पुसद (Pusad heavy rain) : यंदा 23 जुलै पर्यंत तालुक्यामध्ये शेतीपूरक पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. पुसद शहरासह तालुक्यामध्ये 23 जुलै रोजी दुपारपासूनच पावसाची रिमझिम सतत धार सुरू आहे. अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा असून तालुक्यासह शहरातील नदी नाल्यांना कोणताही पूर आलेला नाही. तर शेतकऱ्यांच्या शेतातूनही पाणी वाहून गेलेले नाही. तर यंदा आजपर्यंत अतिवृष्टी व (heavy rain) पावसामुळे कोणतेही नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही. श्रावण महिन्यात अर्थातच ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. हे विशेष