पुसद (Pusad Heavy Rain) : शहरासह तालुक्यात 31 ऑगस्ट च्या मध्यरात्री तर सप्टेंबर च्या दुपारी बारा वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्यात प्रचंड हाहाकार उडवला होता. तर या नैसर्गिक तांडवांमध्ये तालुक्यातील दोन नागरिकांना नदी नाला पार करताना पुरात वाहून गेल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. तर तर अनेक गोरगरिबांच्या राहत्या घरांची पडझड होऊन होत्याचं नव्हतं झालं आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी (Heavy Rain) गेल्यामुळे संपूर्ण शेती खरडून गेली आहे. तर पुसद शहरातील बाजारपेठे मधील व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे प्रचंड मोठे नुकसान व्यापाऱ्यांचे झाले आहे. कृषी व्यापाऱ्यांच्याही दुकानात व गोदामात पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. तर शहरापासून जवळ असलेले वडसद गावामध्ये लगत असलेल्या नाल्याचा पूर पूर्णपणे घुसल्यामुळे संपूर्ण गाव जलमय झाले होते. गावातील एकाही घरातील घरगुती साहित्य घरात राहिले नाही, अनेकांची घरे पत्रे वाहून गेली. तर लगत असलेल्या कारला देव या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गावांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अवघे दीड एकर शेत असलेला शेतकरी पवन नारायण डाखोरे रा. जुना कारला या तरुणाला अवघे दीड एकर शेत शेत सर्वे नंबर 33 या शेतीतून जे उत्पादन निघेल त्यावरच त्याच्या कुटुंबाचा गाडा चालत असेल. (Heavy Rain) शेती करून तो पुसद येथील एका किराणा दुकानांमध्ये नोकरी सुद्धा करत असे, मात्र नैसर्गिक संकटाने त्याचे संपूर्ण शेत खरडून गेले. अत्यंत गोरगरीब असलेल्या या शेतकऱ्याला व नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या सर्वच शेतकऱ्यांसह नागरिकांना शासनाने ढोबळ मनाने कुठलेही निकष न लावता आर्थिक मदत करून मदतीचा हात देणे गरजेचे आहे हे विशेष.