पुसद (Pusad Heavy rain) : यंदा खरीप हंगामामध्ये मान्सूनचा पाऊस (Heavy rain) पुसद तालुक्यामध्ये दि. १ ऑगस्टपर्यंत शेतीपूरक कोसळत आहे. तालुक्यातील बळीराजा आनंदात आहे. मात्र येणाऱ्या पुढील दोन महिन्याच्या काळात निसर्गाने तालुक्यात अतिवृष्टी गारपीट वादळवार निर्माण केले. मात्र बळीराजाच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
१ ऑगस्ट रोजी तालुक्याकरिता संजीवनी ठरलेले वसंत सागर हे ओव्हरफ्लो (Heavy rain) झाले आहे. यामुळे तालुक्यासह शहरातील वर्षभराच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची सोय निर्माण झाली आहे. शहरासह तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची सतत धार सुरू आहे. मात्र या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजा सध्या तरी सुखावल्याचा आनंद व्यक्त करीत आहे, हे विशेष.