पुसद (Pusad heavy rain) : पुसद मध्ये तिसऱ्या दिवशीही सायंकाळ सहा वाजताच्या दरम्यान धुवाधार पाऊस कोसळला. दिवसभर उन्हाळ्यासारखी ऊन आणि सायंकाळी पाण्याचा तडाखा यामुळे वातावरण बिघडले असून साथ रोगाची सात शहरात सुरू आहे. आज कोसळलेल्या पावसाने मात्र शहरातील सर्वच रस्त्यांवर (Heavy rain) पाणीच पाणी झाले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नुकताच तयार करण्यात आलेल्या अजूनही अपूर्ण असलेल्या बाना ते फुना या रस्त्यावर ईगल कंट्रक्शन कंपनीकडून योग्य पद्धतीने सिमेंट काँक्रीटचे सपाटीकरण न केल्यामुळे रस्त्यावर डबके साचत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही दुकानांमध्ये अक्षरशः हे (Heavy rain) पाणी घुसल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. नुकसानग्रस्त व्यवसायिकांनी आपल्या नुकसानीची दाद मागावी तरी कोणाकडे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाला विक्रेते, जिलेबी वाल्याचे दुकान सह इत्यादी दुकानात पाणी घुसले बाराशे कोटी रुपयाचा रस्ता तयार करण्यात येत असून त्याची गुणवत्ता व अवस्था अशी आहे हे विशेष.