पुसद (Pusad Heavy rain) : धुवाधार पावसाने खतीब वॉर्डातील (मस्तान चौक) येथील अनिस अहेमद टेलर यांच्या घरातील मातीची भिंत कोसळली. या घटनेत मातीच्या मलब्याखाली दबून मुस्कान फातेमा अनिस अहेमद (वय ६ वर्ष) ही चिमुकली दगावल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे. मुस्कान शाळेत जाण्याच्या तयारीत असतांना अचानक घराची भिंत कोसळली. या (Heavy rain) घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चिमुकल्या मुलीचा देखील जागीच करूण अंत झाला.
या घटनेचे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश सरचिटणीस सैय्यद इशत्याक यांनी नायब तहसीलदार गणेश कदम यांना पाचरण करून पंचनामा करण्यात आला. टेलरिंग कामातून उदरनिर्वाह चालविणाऱ्या पीडित परिवाराला नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.