पुसद (Pusad Heavy rain ) : पावसाळा सुरू होऊन अठरा दिवस उलटले. मात्र, पुसद तालुक्यात (Heavy rain) दमदार पाऊस बरसला नाही. शेतकऱ्यांनी कापसाची धूळ पेरणी केली. मागील चार दिवसात काही भागात तुरळक पाऊस झाला खरा. मात्र, (Hot summer) तापमानाचा आकडा ४० अंशाच्या कमी झालेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून लवकर येईल या आधारावर काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. पाऊसच आला नसल्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता मावळत आहे.
पुसदमध्ये नावाला पावसाळा, खरा कडक उन्हाळा
काही दिवस पावसाचा असाच खंड पडला तर शेतकऱ्यांवर दुबार बियाणे खरेदीची वेळ येण्याची भीती बळीराजाला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात होणारा उकाडा नागरिकांना नकोसा झाला आहे. सामान्य नागरिक आणि बळीराजा (Heavy rain) पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. अरबी समुद्राकडून येणारे मान्सून वारे कमजोर गेल्या दशकापासून मान्सून १५ दिवस पुढे विदर्भात मान्सून अद्यापही सक्रिय झाला नाही याचे कारण, गेल्या दशकापासून मान्सून १ १५ दिवस पुढे गेला आहे.
तापमान 40 अंशाच्या कमी नाही
त्यामुळे जूनमध्ये फारसा सशक्त मान्सून दिसत नाही. विशेषतः अरबी समुद्राकडून येणारे मान्सूनचे वारे कमजोर असतात तर विदर्भात बंगालच्या खाडीकडून येणारे वारे पाऊस घेऊन येत असतात असे जुने जाणते वयोवृद्ध नागरिक सांगतात. (Heavy rain) दमदार पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीची लागवडीची घाई करू नये. अन्यथा दुबार पेरणीची वेळ बळीराजावर येऊ शकते. तर अधून मधून येणाऱ्या पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतीसह इत्यादींचे मोठे नुकसान (Heavy damage) झाले आहे, अनेकांच्या घरावरील पत्रे उडून पाळीव जनावरे सुद्धा जायबंदी झाले आहेत.