पुसद (Yawatmal):- महाराष्ट्र मध्ये पुसद ची ओळख राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. या पुसदने महाराष्ट्राला दोन कर्तबगार मुख्यमंत्री (Chief Minister)दिलेत. कै. वसंतराव नाईक व कै. सुधाकरराव नाईक या पुसदला गेल्या 72 वर्षांपासून मंत्रिपदे मिळत आली आहेत. मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून पुसद तालुक्याचा विकास हा रखडलेला दिसत आहे. सहकारी संस्था अवसायानात निघाल्यात अनेक सहकारी संस्थेच्या जमिनी विकून खाल्ल्यात महाराष्ट्रातील शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न उराशी बाळगणारे व प्रत्यक्षात पुसद मध्ये सहकारी संस्थेच्या माध्यमातून साखर कारखाने सूतगिरण्या जिनिंग वसंतराव नाईक यांनी काढल्या होत्या.
गुजरातच्या कंपनीचा ठेका, ठेकेदाराने कामगारही आणले गुजरात वरून
तदनंतर सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडीत काढली. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केली. पुसद तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी जलसंधारण (water conservation) हे धोरण अवलंबले पाणी जिरवा पाणी आडवा हे धोरण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राबविले. पुसद जिल्हा व्हावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तर त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं गेल्या पंचवार्षिक मध्ये पुसद तालुक्याला तीन आमदार मिळालेत काँग्रेसचे (Congress) विधान परिषद आमदार डॉ. वजाहत मिर्झा, भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार नाईक घराण्याचे वारसदार एड निलय नाईक तर पुसद विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन व विद्यमान इंद्रनील नाईक खरं बघितलं तर या तिघांनी पुसदच्या विकासासाठी आपली सगळी राजकीय बळ वापरून विकासाचा महामेरू तालुक्यात आणायला हवा होता. शिवाय तालुका हा जिल्हा झाला.
67 कोटीची पाणीपुरवठा पाईपलाईन योजना टाकण्याच्या काम त्यांनी खेचून आणले
पुसद मधील बेरोजगारांना इतर ठिकाणी कामाच्या शोधार्थ आपल्या परिवारासह जाण्याचे काम पडू नये असे उद्योग औद्योगिक वसाहतीमध्ये आणलेले असते. मात्र असं काहीही झालेलं नाही. विद्यमान आमदारांनी विकासाचा लेखाजोखा मांडला. मात्र त्यांच्या या विकासामध्ये कुठेही गुणवत्ता दिसून आली नाही तर त्यांचे मित्र मंडळींनीच सदरची कामे हाती घेतल्यामुळे सदर कामांची गुणवत्ता ही दुर्बीण लावून शोधावी लागत आहे. इतकेच नव्हे तर विद्यमान आमदारांच्या प्रयत्नातून पुसद शहरांमध्ये 67 कोटीची पाणीपुरवठा पाईपलाईन योजना टाकण्याच्या काम त्यांनी खेचून आणले. सदरचे काम हे त्यांनी गुजरातच्या कंपनीला दिले व त्या गुजरातच्या कंपनीने शहरामध्ये कामात सुरुवात केली तर संबंधित ठेकेदाराने संपूर्ण साहित्यासह रोजगारही गुजरात मधून आणले. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांच्या सौभाग्यवती या गुजरातच्या पुसद तालुका हा बेरोजगारीने ग्रस्त असतानाही पुसद तालुक्यातील व शहरातील स कुशल व अकुशल कामगारांना मोठे काम मिळत होते. त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह झाला असता अनेकांच्या हाताला काम मिळाले असते तर काही प्रमाणात तालुक्यासह शहरातील बेरोजगारी कमी झाली असती.
पुसद तालुक्याचे काम गुजरातला पळालं
मात्र विद्यमान आमदारांच्या त्यांच्या सौभाग्यवतीच्या मनमर्जी ने सुरू असलेल्या या कामामुळे तालुक्यातील बेरोजगारांच्या हातातील कामही गुजरातला पळाले शेवटी हे पुसदकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. संबंधित कामगारही बिचारे आपल्या लेकरा बाळासह चिल्या पाळल्यासह गुजरात वरून येथे येऊन पहाटे पहाटे आपल्या हातामध्ये तीकास घेऊन विशेष करून महिला मुली हे आपलं कर्तव्य बजावत आहेत. यांचे लहान लहान लेकरं बसलेले दिसत आहेत. शेवटी देशातील कुठलाही बेरोजगाराच्या हाताला काम मिळणे हे महत्त्वाचे म्हणावे लागेल. मात्र पुसद तालुक्याचे काम गुजरातला पळालं, कामगारही गुजरातहून आले हे पुसदकरांचे. दुर्दैवच