पुसद (Pusad Mahavitaran) : तालुक्यातील नाणंद -3 येथील शेतकरी आनंदराव नागोराव पठाडे (Pusad Farmer) यांची चार एकर शेत जमीन आहे. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी शेतीचे सिंचन करण्याकरिता बोरवेल मारलेली आहे. त्यावर बसविलेल्या मोटर द्वारे शेतीची सिंचन करण्याची सुविधा त्यांना उपलब्ध व्हावी याकरिता त्यांनी थ्री फेज विद्युत पोलवर उपलब्ध होत नसल्यामुळे व सातत्याने 2 फेज लाईन राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीचे सिंचन करता येत नव्हते त्यामुळे त्यांनी वारंवार (Mahavitaran Company) महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून अनेकदा विनंती अर्ज निवेदने देऊन तरीही काहीही उपयोग झाला नाही.
शेवटी कंटाळून त्यांनी बारा हजार रुपयाचा केबल विकत घेऊन गावातून शेतामध्ये लाईन नेली. (Mahavitaran Company) महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना पूर्वकल्पना न देता ती केबल जप्त करून नेली. वारंवार अर्ज करूनही व सर्व बिले भरूनही शेती करिता सिंचन साठी थ्री फेज लाईन महावितरण कडून गेल्या चार वर्षापासून उपलब्ध करून दिल्या गेली नसल्यामुळे. संबंधित शेतकरी त्रस्त झाले आहे. महावितरण ने आठ दिवसात जर मला थ्री फेज लाईन शेती करिता उपलब्ध करून नाही दिली तर मी (Pusad Mahavitaran) महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी एका पत्रकार द्वारे कळविले आहे.