पुसद (Pusad Marriage) : लग्न म्हंटल की, सनई चौघडे आले, (marriage ceremony) लम्नविधी लावणारे आले, विधी, शुभमुहूर्त आले आणि डीजे बँड बाजाचा धुमधडाका आला. हिंदू धर्मात अशाच पद्धतीने लम केले जाते. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन दिल जाते. मात्र लगतच्या श्रीरामपूर मधील रहिवासी व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षांनी स्वतःच्या मुलाचा विवाह हा पारंपरिक पद्धती तसेच मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरा व वैदिक पद्धतीला पूर्णपणे छेद देत (Maratha samaj) मराठा समाजात पहिला ऐतिहासिक असा आगळा वेगळा शिवविवाह सोहळा दि. २९मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुसद येथे पार पाडला.
पुसद येथे पार पडला आगळावेगळा शिवविवाह
आदित्य आणि दीपाली असे उच्च शिक्षित वर वधूचे नाव आहे. त्यांच्या लग्नात ना ब्राह्मण होते, ना त्यांनी काढलेला मुहूर्तः ना अक्षता, ना बँड, डीजे , ना बाजा होता. स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ व कुळवाडी भूषण छत्रपती शिवानी महाराजांनाच डोळ्यांसमोर ठेवून हा (Shiva Marriage) शिव विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे या अनोख्या लग्नाची गोष्ट संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीरामपूर येथील अमरनगर येथे राहणाऱ्या व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मंदा सुभाष इंगोले यांचा बी.ई. असे उच्च शिक्षण घेतलेला सुपुत्र आदित्य आणि बुलडाणा जिल्हा व खामगाव तालुक्यातील चाडी येथील संभाजीराव मांगले यांची एम. कॉम. झालेली कन्या दीपाली यांचा शिवविवाह दि .२९ मे रोजी येथील पलिकोंडावार ले आउटमध्ये वराचे मामा व माजी नगरसेवक नितीन पवार यांनी त्यांच्या घरासमोरील प्रांगणात अनोख्या पद्धतीने शिव विवाह पार पाडला, सुरवातीला विधीमंचावर वधूची मात्रापिता, काका काकू तर वराची माता, काका-काकू, मामा-मामी हे विराजमान होते .
यानंतर वधू-वराने छत्रपती शिवाजी महाराज व वर पिता (कै.) सुभाष इंगोले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (Pusad Marriage) यानंतर कु.आसावरी नितीन पवार हिने सुरेल आवाजात जिजाऊ वंदना सादर करून शिव विवाहाला सुरवात केली, (marriage ceremony) लग्न सोहळ्याच्या वेळी असंख्य पाहुण्यांसह मान्यवर, व निमंत्रितांना पारंपरिक पद्धतीमध्ये ज्वारी, तांदूळ यांच्या अक्षता देऊन अन्नाची नासाडी केल्या जाते, ते न देता सर्वांना फुले देण्यात आली. त्यानंतर कोणताही धार्मिक विधी न करता नितिन पवार व कु.आसावरी पवार यांनी शिवसातके सादर केली. ”
उपस्थितांनी शेवटच्या शिवसतकानंतर वर-वधूवरांवर पुष्प वर्षाव करून शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर वराने व वधूने शपथ घेतली. एकमेकांना हार घातला आणि सर्व नातेवाइकांना दंडवत घालून शुभाशीर्वाद घेऊन हा शिवविवाह सोहळा पार पडला. बदलत्या काळात समाज प्रबोधनाचा विचार आणि प्रत्यय या शिवविवाहामुळे आला. या अनोख्या (Shiva Marriage) शिवविवाहाला ययाती नाईक, शरद मैंद, अनिरुद्ध पाटील चोंडीकर, विजय जाधव, अशोक बाबर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, गटविकास अधिकारी टाकरस, प्रकाश पानपट्टे, अॅड. भारत जाधव, पत्रकार ललित सेता,दीपक महाडिक, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.