रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या
पुसद (Municipal Council Administration) : शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा व (Municipal Council) मोकाट कुत्र्यांचा मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर व शाळा परिसरात कळपांचे जत्थे फिरत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर या संदर्भात दैनिक देशोन्नतीने अनेकदा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी वृत्तही प्रकाशित केले व कॅमेरा लेन्स मध्येही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यर्थ ठरला.
हे दुर्दैव दि. 17 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशाच मोकाट गाई सोबत फिरणाऱ्या बछड्याचा गाडीची ठोस लागून बळी गेला. सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून जे गोपालकांचे मालक आपली जनावरे मोकाट रस्त्यावर सोडत असतील त्यांच्यावर (Municipal Council Administration) नगरपरिषद प्रशासनाने गुन्हे दाखल करायला हवेत ज्यांना आपली जनावरे पाळता येत नसतील त्यांनी जनावरे पाळू नये व मोकाट सोडू नये अत्यंत ऐरणीवर आलेला हा प्रश्न केवळ मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस हेच कायद्याने सोडवू शकतात. मोकाट कुत्र्यांचा ही तसाच विषय निर्माण झालेला आहे. सदरील कुत्र्यांचे कळप लहान मुलांवर विद्यार्थी विद्यार्थिनींवर वयोवृद्ध नागरिकांवर चाल करून जाताना दिसत आहेत. ज्याला पाय बंद घालने गरजेचे आहे, हे विशेष…