पुसद (Pusad Municipal Council) : शहरातील नप अंतर्गत येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक दरम्यान, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे, व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या अतिशय दुर्लक्षित धोरणामुळे अनावश्यक डिव्हायडर ची निर्मिती करण्यात आली होती. तर या परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांनी रस्ता काबीज केलेला. (Pusad Municipal Council) काही राजकीय नेत्यांनी मताच्या जोगव्यासाठी त्यांचा बचाव करण्यासाठी या डिव्हायडरची अनावश्यक निर्मिती केली.
नगरपरिषदेचे (Pusad Municipal Council) तब्बल लाखो रुपये यामध्ये वाया घालविली. आज त्याच डिव्हायडर मध्ये परिसरातील अतिक्रमणधारक यांनी मोठ्या प्रमाणात घाण कचरा चढलेला भाजीपाला टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, सतत धार पाऊस कोसळत आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांनी लक्ष देणे गरजेचे आहे एवढं मात्र खरं.