पुसद (Pusad Municipal Council) : पुसद नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या परिसरामध्ये नगरपरिषदेच्या विद्युत विभागामार्फत लाईट दुरुस्ती करण्यात येत असते. अनेक प्रभागांमध्ये एका खाजगी कंपनीकडून सौर ऊर्जेचे लाईट बसविण्यात आले होते. त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी त्या कंपनीवर होती. मात्र संबंधित कंपनीने सर्व आपली कामे गुंडाळली आहेत बंद केली आहेत.
तर पुसद नगर परिषदेच्या (Pusad Municipal Council) विद्युत विभागाला प्रशिक्षित, कुशल लाईनमन ची कमतरता असल्यामुळे व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची उपलब्ध नसल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडून (Electricity Department) मजूर उपलब्ध करून शहरातील नागरिकांना नागरी सेवा देण्याचा प्रयत्न केला जात होता. संबंधित लेबर पुरवणाऱ्या कंपनीने विद्युत विभागात नेमण्यात केलेल्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही विमा, व कोणतीही जबाबदारी न घेतल्यामुळे व कंत्राट घेताना कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पगार देण्याचे सांगूनही प्रत्यक्षात कमी पगार देण्यात येत असल्यामुळे चार-पाच कर्मचाऱ्यांनी कामे सोडून पळ काढला होता.
मात्र तारतंत्री व कायमस्वरूपी कर्मचारी सतीश शिनगारे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांना वरील सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. कर भरणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास, माजी नगरसेवक असलेल्या कंत्रालदारांचा त्रास सविस्तरपणे विशद केला. त्यासोबतच एखादे लाईट खांबावरील दुरुस्त करण्यासाठी हार्डलीक वाहन जर मिळाले तर काही मोजकेच कर्मचारी जबाबदारी घेऊन सर्व शहरांची जबाबदारी सांभाळू शकतात याची खात्री दिली.
तातडीने मुख्याधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षात भेटून हे वास्तव विशद केले. त्यांनी तातडीने याला मान्यता देत, येणाऱ्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये जिल्ह्यातील 17 नगरपरिषदेला वरील प्रमाणे वाहन उपलब्ध करून देण्याची आम्ही दिली. मुख्याधिकाऱ्यांनी खरंच बघितलं तर तारतंत्री सतीश शिनगारे यांचे कौतुक केले व त्यांच्यामुळेच पुसद सह इतर (Pusad Municipal Council) नगरपालिकांना सुद्धा हे वाहन उपलब्ध झाले. असे ” दैनिक देशोन्नतीशी ” बोलताना त्यांनी सांगितलं.