शासनाने नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागामध्ये कायमस्वरूपी साफसफाई कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे
पुसद (Pusad municipal council) : शहरातील मोतीनगर,संभाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिहार गेस्ट हाऊस मागील परिसर, बस स्थानक परिसरातील गेटवर या शिवाय शहरातील अनेक परिसरात किरकोळ व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य दुकानदारांनी फेकलेला कचरा, पन्या याचे ढिगारे कायम पसरलेली असतात. यामुळे परिसरात घराणीचे साम्राज्य पसरलेले दिसते तर या पडण्यावर या घाणीवर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसलेले दिसतात मुक्या प्राण्यांचे आरोग्य ही यामुळे धोक्यात आलेली दिसते. संभाजीनगर मधील राणी लक्ष्मीबाई शाळेच्या परिसरात (Pusad municipal council) नपच्या शौचालयाच्या समोरील परिसरात कचऱ्याचे ढिगारे पसरल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.
पावसाळ्यात या घाणीमुळे परिसरात डांसाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे डेंगू मलेरिया सारख्या साथीचे आजार डोके वर काढताना दिसत आहे. परिसरातील सामान्य नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना या घाणीचा खूप त्रास करावा लागत आहे.अत्यंत गरीब व व रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंबे इथे राहतात. संभाजीनगर मध्ये नगरपालिकेची पावसाळ्यापूर्वीची कुठल्याही प्रकारच्या डासांचे निर्मूलन करणारी कोणतीही फवारण्या करण्यात आलेल्या नाहीत. कुठल्याही प्रकारचे जागोजागी असलेले कचऱ्याचे ढिगारे नियमित (Pusad municipal council) नगरपालिका आरोग्य विभाग (health department) साफ करीत नाही असा आरोप नागरिक करताना दिसत आहेत . तरी संभाजीनगर परिसरातील रहिवाशांचे नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांनी या कडे लक्ष देऊन आरोग्य विभागाला तात्काळ या परिसरात डास निर्मूलन फवारण्या करण्याचे आदेश द्यावे व परिसरात कचऱ्याचे ढिगारे तात्काळ हटवून परिसर दुर्गंधी मुक्त करावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.
पुसद नगरपालिकेमध्ये (Pusad municipal council) ज्या कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधी सह राजकीय पाठबळ मिळालेले आहे. अशाच कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा बोलबाला नगरपालिकेत दिसत आहे. विशेष करून पुसद नगरपालिकेचे (health department) आरोग्य निरीक्षक प्रशांत देशमुख यांच्याकडे तब्बल तीन विभागाचा कारभार आहे ते या विभागांच्या कामांना किती न्याय देतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. मात्र लोकप्रतिनिधी सह माजी डॅशिंग व डॉन असणाऱ्या नगरसेवकांची पाठबळ अशा अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर शहरांमध्ये यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा काय ठेवायला हवी हे दुर्दैव पुसदकरांचे.