पुसद शहरात नपच्या आरोग्य विभागाकडून धूर फवारणी
पुसद (Pusad Municipal Council) : बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे तर एक सप्टेंबर रोजी अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोगराई आता साथ रोगाची सात पसरली असून प्राथमिक (Health department) आरोग्य केंद्र सह उपजिल्हा रुग्णालय तथा खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरिया, डायरिया, टायफाईड, डेंगू, सदृश्य आजाराने ग्रस्त असलेल्या आजारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पुसद नगरपरिषद (Pusad Municipal Council) अंतर्गत येत असलेल्या अनेक प्रभागांमध्ये डास मच्छरांचा उच्छाद वाढल्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. तर प्रभाग 14 मधील अनेक नागरिकांना डेंगू सदृश्य आजाराने ग्रस्त झाल्यामुळे हैदराबाद येथे (Health department) उपचाराकरिता दाखल होण्याची वेळ आलेली होती. दैनिक देशोन्नतीने वारंवार या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस त्यांनी याची गंभीर दखल घेत नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या सर्वच प्रभागांमध्ये नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत धूर फवारणी मोहीम सुरू केली आहे.
दि. 26 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज वार्ड प्रभाग क्रमांक बारा व सहा मध्ये नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी वंजारे व इतर यांच्यामार्फत संजय पवार यांच्या सुपरव्हिजन मध्ये धूर फवारणी करण्यात आली. या धूर फवारणी मध्ये मात्र (Pusad Municipal Council) नगरपरिषदेने सातत्य ठेवणे गरजेचे असून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विशेष करून झोपडपट्टी एरिया स्लम एरिया परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर फवारणी करणे अपेक्षित आहे हे विशेष.