पुसद (Pusad Municipality) : शहरात मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा अवस्थेमध्ये जनावरांचे कळप बसलेले नित्यनियमाने दिसत आहेत. तर मोकाट जनावरांचे मालक हे आपली जबाबदारी झटकून आपली जनावरे मोकाट रस्त्यांवर करण्यासाठी सोडत आहेत. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन. अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रात्री अपरात्री मोकाट जनावरांची कळपे (Pusad Municipality) शहरातील विविध प्रभागांमध्ये वार्डांमध्ये अंतर्गत रस्त्यांवर बसलेली दिसत असते.
या संदर्भात गांधीनगर येथील काही नागरिकांनी राज्याच्या गोसेवा आयोगाला (Goseva Aayog) यासंदर्भात ऑनलाईन तक्रारी दाखल करून (Pusad Municipality) पुसद नगरपालिकेला आदेश काढून संबंधित मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील आयोगाने याची गंभीर दखल घेत. (Pusad Municipality) पुसद नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांना गोसेवा आयोगाने पत्र जारी करून संबंधित मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व रस्त्यांवर अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांना नगरपालिकेच्या कोंडवड्यात टाकणे असे स्पष्ट सूचित केले होते.
त्याकडे नगरपालिका प्रशासनाने (Pusad Municipality) दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. शहरातील गांधीनगर येथील सुमारे 51 नागरिकांनी महाराष्ट्र गोसेवा आयोग (Goseva Aayog) यास पत्र देऊन असे कळविले होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य दिवाकर नेरकर यांनी (Pusad Municipality) पुसद नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्राणी क्रूरता अधिनियम 1960 अन्वये मोकाट सोडणाऱ्या गाई मालकावर सूचना देऊन योग्य शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावीअसे निर्देशित केले होते.
मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना सूचना पत्र देण्यात येईल, तर मोकाट जनावरांना नगरपालिकेच्या कोंडवाड्यात शोध घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल.
– मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस