मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन
पुसद (Pusad Municipality) : पुसद नप अंतर्गत येत असलेल्या शहरातील सहारा पार्क लगत असलेल्या आदित्य नगर येथील नागरिक मोहम्मद वसीम जोया व इत्यादी नागरिकांनी दि. 7 ऑगस्ट रोजी नपचे अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांना या (Pusad Municipality) परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या तसेच सहारा पार्क डीपी रोडवरील खड्ड्यांमध्ये मुरूम व रस्त्याचे काम करून द्या या आशयाची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ते निवेदनात म्हणतात की, या परिसरातील नाल्यांची साफसफाई नियमितपणे होत नाही.
परिसरातील पथदिवे सातत्याने बंद राहतात. या परिसरात राहणारे नागरिक पुसद नपला नियमितपणे कर भरतात. मात्र नागरी सुविधा या (Pusad Municipality) परिसरात नगरपालिकेकडून पुरविल्या जात नाहीत त्या नियमितपणे पुरविल्या जाव्यात असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मोहम्मद वसीम जोया, रमेश मनवर, शैलेंद्र चिंचोलकर, आतिफ शेख, अनिल पंडागळे, भाऊराव राठोड, नितीन सोनुने, अजय पाटील, ए पी देशमुख यांच्यासह इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.