पुसद (Pusad Murder case) : तालुक्यातील मोप येथील 45वर्षीय विवाहित व्यक्तीचा कठोळी शेत शिवारामध्ये झाडाला लटकलेल्या (Murder case) अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मृतकाच्या कुजलेल्या शरीरावर मारहाणीच्या जखमा कुटुंबियांना दिसून आल्याने, हा घातपात असल्याचा त्यांचा संशय आहे. दत्ता तुकाराम चव्हाण वय अं ४५ वर्ष रा.मोप हा२७ मे रोजी कुटुंबीयांना शेतामध्ये जातो, असे सांगून घरून निघून गेला. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र तपास घेतला. मोपपासून सात किलोमीटर अंतरावर कठोळा शेत शिवारातील किसन राठोड व बाबूसिंग राठोड यांच्या शेतालगत झाडाला लटकलेल्या व पुर्णपणे कुजलेला अवस्थेत दत्ता चा मृतदेह आढळून आला. ही माहिती (Pusad Police) खंडाळा पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले.
घातपाताचा नातेवाईकांचा आरोप
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे डॉक्टरांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले. घटनास्थळ परिसरातच दत्ताच्या वडीलाचे शेत असून, कोणीतरी पैशाच्या कारणावरून त्याला ठार करून (Murder case) मृतदेह लटकविल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. पत्नी मुलगा, विवाहित मुलगी, वयोवृद्ध आई, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी मर्ग दाखल करून (Pusad Police) खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील व बीट जमादार घटनेचा अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक दर्शनी ही आत्महत्याच असून अधिक चौकशी सुरू असल्याचे ठाणेदार देविदास पाटील यांनी सांगितले.