पुसद (Pusad nagar panchayat) : शहरातील अतिशय उच्चभ्रू श्रीमंत लोकांची वस्ती असलेला परिसर म्हणून मोती नगर ची ओळख आहे. तर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांचेही निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरच असलेल्या नपच्या गार्डन मधील आवारातील पन्नास वर्षापासून मान ताठ करून उभी असलेली झाडे आहेत. त्यातील बरीच झाडे वयोवृद्ध झालेली आहेत. त्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी गजानन तोडक यांच्या पुढाकारात नगरपरिषद प्रशासनाला झाडे कटाई करण्याचे निवेदन दिले होते.
मात्र त्याकडे न प प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सात सप्टेंबर च्या पहाटे आठ वाजता च्या दरम्यान पन्नास वर्षे वय असलेले जुने झाड अचानक कोसळले रस्त्यावर कोसळल्यामुळे व तारांवर कोसळले. यामुळे एखादी भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र सुदैवाने अशी कुठलीही दुर्घटना घडली नाही. महावितरणच्या विद्युत तारांचे मोठे नुकसान झाले तर परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला हे विशेष.