पुसद नगर पंचायत सार्वजनिक बांधकाम व नप प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
पुसद (Pusad Nagar Panchayat) : छत्रपती शिवाजी महाराज चौकात लगत असलेल्या पुसद वाशिम रस्त्या जवळील धनसळ पांदण यांच्या मालकीच्या जागेवर काही अतिक्रमित लोकांनी शासकीय जागेचा गैरफायदा उचलत अनेक नागरिकांकडून व्यावसायिकांकडून डिपॉझिट च्या नावावर लाखो रुपये घेऊन अवैध बांधकाम करण्याचे धाडस जोरात सुरू केले आहे. या गंभीर बाबी संदर्भात एका जागरूक नागरिकांनी माहितीच्या अधिकारात (Nagar Panchayat) नगरपरिषद प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम विभागालाही या संदर्भात विचारणा केली आहे.
मात्र दोन्ही प्रशासन विभागाकडून (Nagar Panchayat) त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आलेली दिसत आहे. अत्यंत खेदजनक असलेला हा विषय कर्तव्यदक्ष असलेले मुख्याधिकारी अभिजीत वायकोस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष उपअभियंता प्रकाश झळके यांच्या निदर्शनास ही बाब का येत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे हे विशेष.