विद्यार्थ्याचे दोन दात पाडले
पुसद (Pusad School) : शहरातील नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Navjivan Gyandeep English Medium School) एका शिक्षकाने प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी उशिरा आला म्हणून त्या विद्यार्थ्याच्या तोंडावर लाकडीने रुळाने बेदम मारहाण केल्याने त्या विद्यार्थ्याचे दोन दात पाडले. या संताप जनक घटनेमुळे पालक वर्गात रोष व्यक्त केल्या जात आहे. तर विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सर पोलीस ठाणे (Pusad City Police) गाठत त्या शिक्षिकाविरुद्ध तक्रार दिली. त्या तक्रारीवरून (Pusad City Police) शहर पोलीस ठाण्यात त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद शादुल्ला सय्यद लाल वय 36 वर्ष रा. पार्वतीनगर पुसद असे तक्रारकर्त्या वडिलाचे नाव आहे. तर बालाजी मनोहर बिरादार व 51 वर्ष रा.ज्ञानेश्वर नगर चिंतामणी कोचिंग क्लासेस जवळ पुसद असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
सय्यद शादुल्ला यांचा मुलगा सय्यद बिलाल हा (Navjivan Gyandeep English Medium School) नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे 7 व्या वर्गात शिकत असून दि.२३ जुलै रोजी सय्यद बिलाल हा सकाळी 9 वा. शाळेत गेला होता. दरम्यान 11वाजेच्या दरम्यान सय्यद शादुलला यांना शाळेतून फोन आला व तुमच्या मुलाची तब्येत बरी नाही त्यास घेऊन जा असे सांगितल्याने सय्यद शादुला हे शाळेत गेले असता मुलगा शाळेच्या आवारात बेंचवर बसलेला दिसला. त्यास काय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी प्रार्थनेकरिता थोडा उशिरा गेलो. त्यामुळे रागात येऊन बालाजी मनोहर बिरादार या सरांनी मला लाकडी रुळाणे तोंडावर मारले त्यामुळे माझे खालचे दोन दात तुटले व वरचे दोन दात हलत आहे.असे सांगितले.
त्यामुळे सय्यद शादूल्ला यांनी मुलाला घेऊन शहर पोलिस ठाणे (Pusad City Police) गाठले आणि सय्यद बिलाल यास बालाजी बिरादार सरांनी प्रार्थनेत उशीर उशिरा का आला या कारणावरून लाकडी रुळाणे तोंडावर मारले त्यामुळे मुलाचे खालचे दोन दात तुटले व वरचे दोन दात हलत आहे. अशी तक्रार दाखल केल्याने आरोपी शिक्षकावर दि. २४ जुलै रोजी कलम 117 (2) भारतीय न्याय संहिता यानुसार (Pusad Crime) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील विविध शाळा प्रशासना सह मुख्याध्यापकांनी आपल्या इंग्लिश मराठी हिंदी शाळेमध्ये वर्ग शिक्षकांवर व आपल्या विद्यार्थ्यांवर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात यापूर्वीही अनेक विचित्र घटना काही नामांकित इंग्लिश शाळांमध्ये घडलेले आहेत, त्याचे भान ठेवत शाळा प्रशासनाने व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी या संदर्भात सजग राहणे गरजेचे आहे हे विशेष. “