Pusad news :- ११ ऑगस्ट रोजी दु. अंदाजे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान भोजला कोपरा शिवारातील एका खदानीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने (unfortunate incident) संपूर्ण गाव शोकमग्न झाले. ९ वर्षीय सोहम हिम्मत कवचट, तिसरीत शिकणारा चिमुकला विद्यार्थी, पाण्याच्या गाळात अडकून जग सोडून गेला.
गावकर्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून जीवाच्या आकांताने शोधमोहीम सुरू केली
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गावातील ९ ते १० वर्षांची काही शाळकरी मुले(School students) पोहण्यासाठी या खदानीत गेली होती. पाण्याची खोली आणि त्यातील गाळाचा अंदाज न आल्याने खेळता खेळता जीवघेणी वेळ आली. काही मुले सुरक्षित बाहेर आली, मात्र सोहम मात्र खोल गाळात अडकला. घटनास्थळी उपस्थित मुलांनी तात्काळ गावात धाव घेऊन गावकर्यांना माहिती दिली. गावकर्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून जीवाच्या आकांताने शोधमोहीम सुरू केली. बराच वेळ शर्तीचे प्रयत्न करून सोहमला बाहेर काढण्यात आले आणि खाजगी वाहनाने पुसद येथील सरकारी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. सोहमच्या वडिलांचे निधन अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. घरातील मोठा मुलगा असून लहान भावाचा तो आधार होता. त्याच्या अचानक जाण्याने भोजला गावात हळहळ व्यक्त होत आहे.




