कारभार प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या भरोशावरच!
पुसद (Pusad Panchayat Samiti) : गेल्या काही काळापासून पुसद पंचायत समितीला (Panchayat Samiti) उच्च दर्जाचे गटविकास अधिकारी कायमस्वरूपी मिळत नसल्यामुळे पुसद पंचायत समितीच्या कारभाराला अवकळा आलेली आहे. अनेक घोटाळे होत असतानाही जाणून-बजून ते दाबल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या सिंचन विहिरी एमआरएसजीएस मधून अत्यंत माफक दरात होणे गरजेचे असताना. ते मजुरांकडून न करून घेता काही ठेकेदारांना हाताशी धरून व शेतकऱ्यांकडून आर्थिक लाभ मिळवून सदरील योजना राज्याचे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तथा (Water Conservation Council) जलसंधारण परिषदेचेअध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पुसद पंचायत समितीचे माजी सभापती कै. सुधाकरराव नाईक यांच्या गावात होत आहे.
ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. काही दिवसांअगोदर प्रथम गट श्रेणीचे गटविकास अधिकारी वानखेडे हे काही काळ पुसदला रुजू होते. त्यावेळी (Pusad Panchayat Samiti) पुसद पंचायत समितीच्या विकासाला गती आलेली दिसत होती. मात्र पुसदचा विकास नको असणाऱ्या नेत्यांनी त्यांची बदली करून या ठिकाणी प्रभारी गट विकास अधिकाऱ्यांचा पांडा पार पाडला आहे. ही पुसदकरांसाठी अत्यंत दुखद विषय आहे हे विशेष.