पुसद (Pusad Police) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड येथे एक महिला मोठ्या प्रमाणात (Moha liquor) गावठी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा (Crime branch) पुसदला मिळाल्यावरून दि.29 मे रोजी त्या महिलेच्या घरी छापा टाकला असता अवैधपणे गावठी हातभट्टी दारू तयार करून विकल्या जात असल्याचे आढळून आले. मौजे वरूड गावात महीला निलम अमोल राठोड वय ३५ वर्षे ही तिचे घरी धाड मारली असता त्या ठिकाणी 400 लिटर गावठी दारू चा मोहाचा सडवा मिळून आला.
अंदाजे किंमत 20 हजार रुपये सदर प्रकरणी (Pusad Police) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई सपोनी गजानन गजभारे, पीएसआय शरद लोहकरे, चालक पीएसआय रेवण जागृत, पो हवा तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, पो शि मोहंमद ताज यांनी पार पडली. अवैध देशी दारूचा 400 लिटर मोहाचा सडवा जागीच नष्ट करण्यात आला.
दैनिक देशोन्नतीच्या यवतमाळ लाईव्ह च्या दि.29 मे च्या अंकात भोजला येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासंदर्भात महिलांचा एल्गार वृत्त प्रकाशित झाले होते. याची (Crime branch) स्थानिक गुन्हे शाखेने गंभीर दाखल घेत अवैध गावठी दारू ची वरुड येथे मोठी कारवाई केली हे विशेष.