सराईत गुन्हेगार राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल
पुसद (Pusad Police) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छत्रपती शिवाजी वॉर्डातील विनोद रंगराव जाधव यांच्या मालकीच्या जाधव किराणा मॉल मध्ये दि.27 जुलै रोजीच्या रात्री 9.30 जाधव किराणा मॉल विनोद जाधव यांनी बंद करून किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर घरी झोपी गेले. दि. 28 जुलै च्या सकाळी आपले दुकान उघडण्याकरता आले असता किराणा दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. विनोद जाधव यांनी त्यामुळे दुकानाची पाहणी केली. त्यामध्ये त्यांना दुकानातील काजू बदाम असा ड्रायफूट व रोख रखम तेरा हजार रुपये असा मुद्देमाल चोरी गेल्याचा रिपोर्ट (Pusad City Police) शहर पोलीस ठाण्यात दिला होता.
या फिर्यादीवरून (Pusad City Police) शहर ठाण्यात अपराध क्रमांक 552/2024 कलम303(3),331(4) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात (Pusad City Police) शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसलकर यांनी घटनेचे गांभीर्य बघत सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा डीबी पथकाचे प्रमुख निलेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना निर्देशित करीत शहरात रात्री घरपोडी करणाऱ्या चोरट्यांचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले. गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगार आरोपी खेतराजी माणिक पवार रा. खरबी ता. हिंगोली याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची पंचायत समक्ष तपासणी केल्यानंतर बॅग मध्ये घरफोडीचे साहित्य लोखंडी टॉमी, दोन पेंचीस, कटर, एक मोठे पेज कटर, टॉर्च,लुंगी व काजू बदाम नगदी एक हजार साठ रुपये असा मुद्देमाल मिळून आला. त्याला जाधव किराणा मॉल फोडल्याची विचारपूस केली असता त्याने ते कबूल केली.
त्यामुळे त्याला कायदेशीर रित्या अटक करण्यात आली व पोलीस कसली रिमांड घेण्यात आला. या सराईत गुन्हेगारावर राज्यातील भुसावळ, चिखली व हिंगोली या ठिकाणी (Pusad City Police) पोलीस ठाण्यात अनेक गंभीर घरफोडीचे गुन्हे दाखल (Pusad Crime) आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप व सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसलकर यांच्या सूचनेनुसार सपोनी तथा डीबी पथकाचे प्रमुख निलेश देशमुख,मनोज कदम, सुनील पवार,दिनेश सोळंके, आकाश बाबुळकर, चालक सुनील ठोंबरे यांनी केली.
अत्यंत किचकट असणाऱ्या या मॉल होळीच्या प्रकरणातील आरोपीला (Pusad City Police) शहर पोलिसांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याने अटक केल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. सदरील आरोपीवर राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.