पुसद (Pusad Police) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील कृष्णनगर येथे दि. 3 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेदहा वाजता दरम्यान पोलिसांनी सापळा कारवाई करून या कार्यवाही मध्ये पत्ता जुगार खेळणाऱ्या प्रतिष्ठित 9जुगाऱ्यांना पोलिसांनी धाडसी कारवाई करीत आरोपींकडून तब्बल एक लाख 71 हजार चा मुद्देमाल अंग झडतीमध्ये हस्तगत करण्यात आला. (Pusad Crime) एकुण नगदी 11,710 रुपये, 2 मोबाईल एकुण किंमत 10,000 – व घटनास्थळावरून 3 मोटर सायकल एकुण किंमत 1,15,000 रूपये असा एकुण 1,71,710- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या जुगाऱ्यांवर (Pusad Police) ग्रामीण पोलीस ठाण्यात अ..क्र.615/2024 कलम 12 (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या सूचनेवरून वेणी बिट इन्चार्ज ASI शेख मसूद, PC योगेश आळणे, राजू शरमते, पवन गादेकर, शेख दानिश यांनी केली. (Pusad Police) पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने मात्र (Pusad Crime) गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.