एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त
पुसद (Pusad Police) : पुसद शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात अनेक तक्रारी शहर पोलीस स्टेशनला व इतरही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. दि. 10 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पुसद शाखेला गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, प्रसाद गव्हाणकर व त्याचा मित्र अक्षय गोले यांना विमल माधव कॉम्प्लेक्सच्या समोर विटाळा मोटर सायकल घेऊन जात असताना त्यांना ताब्यात घेऊन मोटरसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले.
दोन मोटरसायकल व तीन चोरटे जेरबंद
सदर मोटरसायकल चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर मोटरसायकल संदर्भात सखोल चौकशी केली असता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 576/2024303(2) भारतीय न्याय संहिता मधील असल्याची खात्री झाल्याने व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता विचारले असता त्यांनी प्रसाद गव्हाणकर वय 21वर्ष रा. गणेश वार्ड पुसद, अक्षय गणेश गोले वय 21 वर्ष रा. विठावा वार्ड असे सांगितले सदरची मोटरसायकल अभिषेक अनिल शेंडे रा. सुभाष वार्ड पुसद याने पुसद वाशिम रस्त्यावरील येलदरी शेतशिवारातून चोरी करून आणली त्यानंतर मोटर सायकलची नंबर प्लेट ती आम्ही चालवित आहे. असे सांगितले.
सदरची मोटरसायकल जप्त करून अनिल शेंडे याला अधिक विचारपूस केली असता त्याने आणखीन एक काळया रंगाची हिरो होंडा स्पेंडर चोरी करून आणल्याचे सांगितले. सदर मोटर सायकल क्रमांक हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 27 एसी 8797 संदर्भात पडताळणी केली असता सदरचा नंबर चार चाकी वाहनाचा असल्याचे निष्पन्न झाले. सदरची मोटरसायकल जप्त करण्यात आली. एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. व तिन्ही मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले. सदरील मुद्देमाल पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे,चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत, रवींद्र श्रीरामे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहम्मद ताज यांनी केली.