मुंबईचा फरार आरोपी पुसदमध्ये जेरबंद
पुसद (Pusad Police) : मुंबईच्या काळा घोडा पो. स्टे. अंतर्गत सुमारे पाच वर्षांपूर्वी एनडीपीएस अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला आज मुंबई च्या एटीसी पथकाने पुसद (Pusad Police) येथून अटक केली. सुमारे ५ वर्षांपूर्वी करनसिंग दुरलासिंग जस्सोल रा. जगतपूर, जयपूर राजस्थान. याचेवर काळा चौकी पो.स्टे. मध्ये अप क्र १९/२०२१ क ८ (क), २२ (ब) एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत २४ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
तेव्हापासून करनसिंग फरार राहून आपली ओळख लपवत पोलिसांपासून पळत होता.दरम्यान आरोपी चांगला शिक्षित असल्यामुळे पुसद च्या कारला रोडवरील एका कोचिंग क्लासमध्ये मागील काही महिन्यापासुन शिकवित होता. मात्र आज मुंबई येथून एटीसीच्या विक्रोळी युनिटचे एपीआय पंकज भोपळे यांनी कारला रोड वरील कोचिंग क्लास मधून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पुसद शहर पोलीस यांचे सहकार्याने पुसद शहर पो. स्ट. मध्ये आणले. दरम्यान कारवाईसाठी मुंबई पोलीस आल्याने दहशतवादी पकडल्या गेल्याच्या अनेकानेक अफवा पसरल्या होत्या. मात्र शेवटी (Pusad Police) शहर पो. स्टे. ठाणेदार उमेश बेसरकर यांनी वस्तुस्थिती सांगितल्याने सुटकेचा श्वास सोडला.