पुसद (Pusad Police) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसदच्या बस स्थानक परिसरातून फोनवर बोलत असणाऱ्या व्यक्तीच्या गळ्याला चाकू लावून मोबाईल व दुचाकी 35 हजाराचा मुद्देमाल लुटमार केल्याची घटना दि. 31मे रोजी सात वाजताच्या दरम्यान घडली होती. फिर्यादी फिर्यादी मोहन पंडित कुमकर वय 23 वर्ष रा. सेलू ता. पुसद यांनी (Pusad Police) शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे दि. 31/05/2024 रोजी 7:45 वाजता चे बस स्थानकावर पुसद येथे फोनवर बोलत असताना दोन 25 ते 30 वर्ष वयोगटाचे अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले.
शहर डीबी पथकाची कामगिरी
त्यापैकी एकाने फिर्यादीला घट्ट पकडून व दुसऱ्या व्यक्तीने त्याचे गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळ असलेला मोबाईल व मोटरसायकल क्र. MH 29 AJ 5368 अंदाजे किंमत 35,000 रुपये ची जबरदस्तीने हिसकावून पळून गेले व कोणाला सांगितलं किंवा मागे आला तर तुला जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिली दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अप क्रमांक 361/24 कलम 392 34 भादविप्रमाणे गुन्हा नोंद झाला.
याची गंभीर दखल घेत (Pusad Police) पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी पथक सपोनी निलेश देशमुख , प्रफुल इंगोले , मनोज कदम , शुद्धोधन भगत ,आकाश बाभुळकर यांनीआरोपी पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून गोपनीय बातमीदाराच्या आधारे आरोपी निष्पन्न करून आरोपीं कदीर गफार सय्यद वय 34 वर्ष रा. खडसे मैदान वसंत नगर, शेख अफरोज शेख हनीफ वय 32 वर्ष रा. अब्बस मस्जिद जवळ देगलूर नका नांदेड हल्ली मुक्काम सहारा पार्क पुसद यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात दोन मोटर सायकल एक धारदार चाकू 1,05,50 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई (Pusad Police) पोलीस अधीक्षक बनसोड साहेब, उप अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर , पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.