पुसद (Pusad Police) : जिल्ह्यात अति संवेदनशील शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या (Pusad City) पुसद शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात सर्वत्र हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावल्या जात आहेत. या माध्यमातून शहराच्या हालचालीवर पोलीस यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याने निश्चित (Pusad crime) गुन्हेगारीच्या घटनेवर अंकुश मिळविता येणार आहे. या सोबतच नागरिकांच्या सुरक्षा संदर्भातही बारीक लक्ष राहणार आहे.
पुसद शहरात हायस्पीड कॅमेरे तैनात !
महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे या संदर्भात सीसीटीव्ही शहरात लावण्या संदर्भात आवाज गेल्यामुळे एका खाजगी कंपनीकडून शहरात सर्वत्र लोकेशनवर सदर कॅमेरे लावल्या जात आहेत. सर्व हाय स्पीड डेफिनेशन कॅमेऱ्याचे पोलीस ठाण्यात कंट्रोल रूम राहणार आहे. कुठे अनुचित प्रकार घडल्यास त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचणार आहे. शहरातील बस स्थानक परिसर, गुजरी चौक, कापड मार्केट, गांधी चौक, वसंतनगर परिसर अशा विविध ठिकाणी शहरातील संवेदनशील परिसरात लावल्या जात आहेत. प्रत्येक ठिकाणी चार ते पाच कॅमेरे लावल्या जात आहेत. चहूबाजूकडे या कॅमेर्यांची नजर राहणार असून. (Pusad crime) गुन्हेगारीवर यामुळे नियंत्रण मिळविता येणार आहे.सार्वजनिक मिरवणुका व विविध कार्यक्रमासंदर्भातही (Pusad Police) पोलीस प्रशासनाचे या माध्यमातून लक्ष राहणार आहे. हे विशेष.