पुसद (Pusad Police) : पुसद उमरखेड रोडवरील महावीरनगरजवळ रेतीने भरलेला टेम्पो दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पकडला. याप्रकरणी तिघांविरोधात (Pusad Police) शहर पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे. गजानन गणपत घोडेकर (45, रा. काकडदाती) अन्य दोघांवर कारवाई करण्यात आली. यात पावणे दोन लाखांच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहर (Pusad Police) पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून काकडदाती येथे राहणाऱ्या आरोपी गजानन गणपत घोडेकर याच्यावर त्याचे दोन साथीदाराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गजानन घोडेकर ने त्याच्या दोन साथीदारासोबत संगणमत करून पुसद उमरखेड मार्गावरील महावीरनगर जवळून एमएच-20/एटी-3193 क्रमांकाचे वाहन तसेच ऑटो वाहन क्रमांक एमएचएएन 0329 मध्ये प्रत्येकी एक ब्रास व पाऊण ब्रास (Illegal sand vehicle) अशी एकूण 10 हजार रुपये किमतीची रेती विनापरवाना व अवैधरित्या चोरून घेऊन जाताना निदर्शनास आले. (Pusad Police) शहर पोलिसांनी दोन लाख 60 हजार रुपये किमतींचे दोन्ही वाहन आणि 10 हजार रुपये किमतीची रेती असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.