पुसद (Pusad Police) : पुसद शहर हे मागील काही वर्षा अगोदर घडलेल्या घटनांपासून शासन दप्तरी अति संवेदनशील शहर म्हणून नोंदल्या गेलेले आहे. शहरातील भौगोलिक व राजकीय व आर्थिक परिस्थिती बघता व आगामी येणारे सण उत्सव व भविष्यात कुठलाही शहरात अनुचित प्रकार घडू नये, त्याला वेळीच पायबंध घालता यावा. याकरिता (Pusad Police) पोलीस प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार (Ministry of Home Affairs) गृह मंत्रालयाने औरंगाबाद येथील एका कंपनीला कंत्राट देऊन अशा संवेदनशील असणाऱ्या शहरांमध्ये शहरातील संवेदनशील परिसरामध्ये भागामध्ये प्रत्येक मुख्य चौकामध्ये (High Voltage) हाय व्होल्टेज कॅमेरा सीसीटीव्ही (Camera CCTV) बसविण्यात आलेले आहेत.
गुन्हेगारांनो सावधान समाजकंटकांनो सावधान शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केल्यास ” तिसऱ्या डोळ्याची नजर तुमच्यावर आहे ” गृहमंत्रालयाने अतिशय सर्वसामान्य नागरिकांकरिता व्यापाऱ्यांकरिता छोट्या-मोठ्या फेरीवाल्या करिता (Pusad Police) शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहून शहरात शांतता बंधू भाऊ कायम राहावा व सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने आपला दैनंदिन व्यवहार करावा हा आहे. मात्र (Ministry of Home Affairs) समाजामध्ये काही समाजकंटक, गुन्हेगार, काही राजकीय पक्षांचे हेवेदावे करणारे पदाधिकारी हे मात्र शहरातील शांतता बिघडण्याचा व कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्याकरिता हे विशेष.